E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
हिंजवडीतील घटना
पिंपरी : माझी जगायची इच्छा संपली आहे. मी स्वतः माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे, अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका आयटी तरूणीने प्रथम हाताच्या नसा कापून घेतल्या. नंतर ती मैत्रिण राहात असलेल्या सोसायटीतील इमारतीच्या २१ व्या मजल्यावर गेली आणि तेथून उडी मारून आत्महत्या केली.
अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबरे (वय २५), असे त्या तरुणीचे नाव आहे. ती मूळची श्रीगोंदा तालुक्यातील असून तिचे आईवडील शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे अष्टविनायक कॉलनीमध्ये राहतात. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील एका सॉफ्टवेअर कंपनीत ती सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून वर्षभरापासून काम करत होती. ती हिंजवडी गावठाणात विठ्ठल रुक्मिणी मंदिरामागच्या गुरुप्रसाद होम्स या इमारतीत एका मैत्रिणीसोबत पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. शनिवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ती हिंजवडी फेज २ ला पाच किलोमीटर लांब असलेल्या क्राऊन ग्रीन सोसायटीत गेली. तिथे आपली दुचाकी पार्क करून ती २१ व्या मजल्यावर गेली व तेथून उडी मारुन आत्महत्या केली. अनोळखी मुलीचा मृतदेह जमिनीवर पडल्याचे पाहून सोसायटीतील नागरिक भयभीत झाले. शनिवारी सकाळी ७ वाजता रहिवाशांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनास्थळी पोचल्यानंतर २१ व्या मजल्यावर पोलिसांना तिच्या दुचाकीची चावी मिळाली. त्यांनी पार्किंगमधील गाडी शोधून गाडीच्या डिक्कीतील मोबाइल मिळविला. नंतर रूममेट आकांक्षा जगदीश ठाकरे हिच्याशी संपर्क साधला. तिने सांगितले पहाटे १ वाजेपर्यंत ती रूममध्ये होती. परंतु मी झोपल्यानंतर अभिलाषा हिने हाताची नसा कापून घेतल्या, हॅन्डग्लोज घालून ती दुचाकी घेऊन माझ्या रुमपासून पाच ते सहा किलोमीटर तिची एक मैत्रिणी राहते. मैत्रिण राहात असलेल्या इमारतींवर गेली आणि तेथे तिने आत्महत्या केली. पोलिसांना रूमची पाहणी केली असता अभिलाषा हिच्या बेडवर नॅपकिन व इनर वर रक्ताचे डाग दिसून आले. यावरून बाथरूममधील भिंतीवर असलेले रक्त हे अभिलाषाचे असल्याचे खात्री झाली.
तिच्या रुमची झडती घेतली असता अभिलाषा कोथिंबरे यांनी लिहिलेली सुसाईड नोट्स पोलिसांना मिळून आली. त्यामध्ये माझी जगायची इच्छा संपली आहे मी स्वतः मर्जीने आत्महत्या करत आहे, असे लिहिले होते. रक्ताचे डाग असलेले नॅपकिन, इनर, उशीचे कव्हर व मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत. पुढील तपासणीत स्पष्ट झाले की, महत्त्वाच्या अवयवांना दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला, असा दाखला यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिला आहे. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.
Related
Articles
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट
12 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक